Tuesday, February 07, 2006

दहा हजार !

सेन्सेक्सनं काल दहा हजाराचा आकडा गाठल्याची बातमी वाचली आणि माझी पहिली reaction होती... हुश्श: सुटलो बुवा! हा आकडा खरच महत्वपुर्ण आहे यात शंकाच नाही पण मिडिया वाल्यानी, त्याचा मागचे दोन महिने इतका बाऊ केला होता की ज्यांचा शेअर बाजाराशी दुरान्वयानही संबंध नाही असे लोकही त्यात interest घेऊ लागले होते. (बाकी बातम्यांना अगदी खास personal touch देण्याचा उत्साह मात्र आजकाल नको इतका वाढला आहे. बरखा रॉय ही बातमी देताना अगदी स्वत:ला increment मिळाल्याच्या उत्साहात देत होती.)

का कुणास ठाऊक पण मला स्वता:ला मात्र हा बुल रन चा शेवट आहे असच वाटतय. दहा हजार ओलांडुन लोकांनी (म्हणजे FI आणि FII) स्वत:च मानसिक समाधान करुन घेतलय. मार्केट मध्ये सध्या बाहेरचा पैसा जास्त आहे. इतका, की जवळ जवळ सत्तर टक्के. केवळ strong fundamentals हाच एकमात्र सद्हेतु ठेऊन त्यांनी पैसा गुंतवलेला नसुन बाकिच्या (ईतर देशातील) अर्थ व्यवस्था डबघाईला आल्या आहेत किंवा त्यांच्या देशातील अर्थव्यवस्थेची वाढ मंदावलेली आहे हे महत्वाचे कारण आहे. दुसर्‍या एखाद्या देशातील परिस्थिती सुधारली किंवा तिथून मिळणारे returns हे थोडे जरी चांगले असतील तर FII can walk out on India. अशाकाळी मार्केट ला स्थिरता देण्या ईतकी ताकद घरगुती वितीय संस्थांमध्ये अजिबात नाही.

अर्थात या दहाहजारी मनसबी मुळं सर्वसामान्य गुंतवणुकदाराला काही फारसा फरक पडत नाही आणि पडणार ही नाही. ज्यांचे fundamentals चांगले आहेत ते शेअर्स सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. जी काही गंगाजळी आपण गुंतवणार ती midcap आणि smallcap मध्येच. जिथे सतत चौकस रहाणे आवश्यक.

मिलिंद करंदिकर नावाचे गृहस्थ Business Standard मध्ये technical analysis लिहितात. त्यांच्या एका लेखातील वाक्य अगदी मानाला पटल म्हणुन खाली उधृत करत आहे.

A tip to the small investors: The reason behind many small investors remaining small is that they have BIG greed. To become a successful investor, one has to overcome greed, invest only in fundamentally good stocks, book profits from time to time, retain those profits and wait for another opportunity to re-enter at lower levels.

Milind Karandikar
Technical Analyst
Quote source - Business Standard


तळटिप - माझं शेअर बाजारा विषयाबद्द्लचं ज्ञान हे अतीशय तुटपुंज आहे.

Thursday, February 02, 2006

श्री गणेशा

नमस्कार !

आत्तापर्यंत जे मनाच्या पाटीवर खरडल ते आता इथ खरडायचा विचार आहे. प्रयत्न करायचा आहे तो आधी स्वत:शी आणि मग इतरांशी संवाद साधायचा.

माझ्या मनात बर्‍याच वेळा असंख्य विचार मनात चालू असतात. ग्रोसरी बिल ते शेअर बाजार, रस्त्यावरचे खड्डे ते सह्यकडे , बॉसच्या धमक्या ते बायकोच्या कानपिचक्या, सांस्कृतिक प्रदुषण ते महाराष्ट्र भुषण, हे आणि असे बरेच. पण होत काय की या सगळ्या गोंधळात structured thinking नावाचा प्रकारच माझ्याकडुन होत नाही. आणि बर्‍याचदा, आपल एखाद्या विषयावरच मत सहा महिने किंवा सहा वर्षांपुर्वी काय होत हे ही आठवत नाही.

तर आता आस्मादिक प्रयत्न करणार आहेत, जे वाटतय ते लिहिण्याचा....... ती सवय झालिच तर सुसंबध्द लिहिण्याचा....... आणि स्वत:लाच पुन्हा भेटण्याचा.

पण लिहिणार कुठल्या विषयावर ? अगदी कुठल्याही विषयावर.... कविता, साहित्यिक, नाटक, सिनेमा, प्रवासवर्णन, हॉटेलिंग, शेअर बाजार, बॉसच्या तक्रारी....... हे आणि अस बरच.

शेवटी काही झाल तरी चर्चेची गुर्‍हाळं चालवणे आणि मताच्या पिंका टाकणे हा(च) म्हराटी बाणा आहे म्हंटल मिष्टर........